खारवडे येथे श्री म्हसोबा उत्सवाचा उत्साह; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केला ‘बेलपत्राचा हार’

7

पुणे : मुळशीकरांचे परम श्रद्धास्थान असलेल्या खारवडे (जि. पुणे) येथील श्री म्हसोबा भैरवनाथ काळुबाई शंकर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिराला सदिच्छा भेट देऊन श्री म्हसोबांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर देवस्थानने भाविकांच्या लोकसहभागातून साकारलेला भव्य ‘बेलपत्राचा हार’ होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा आगळावेगळा हार श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी “सर्व भाविकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे,” अशी प्रार्थना त्यांनी श्री म्हसोबांकडे केली.

कार्यक्रमाला यावेळी कोल्हापूर करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती महाराज, ह.भ.प. राष्ट्रसंत बाळुमहाराज परांडे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकर मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणे, पुणे महापालिकेचे नगरसेवक किरण दगडे पाटील, स्वीकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर, गणेश वरपे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, अजय मारणे, प्रमोद कोंढरे यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.