हनुमान जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पाषाण नेक्लेस गार्डन येथे दर्शन; मारुतीराया चरणी सुख-समृद्धीसाठी साकडे

6

पुणे : हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील पाषाण नेक्लेस गार्डन येथील हनुमान मंदिराला भेट देऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले. बलोपासना आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा आदर राखत, मंत्री पाटील यांनी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. “हनुमंताची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी नागरिकांना दिल्या.

यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांशी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पाषाण परिसरात पहाटेपासूनच भक्तीमय वातावरण होते आणि मंत्री महोदयांच्या उपस्थितीने उत्सवाचा उत्साह अधिकच वाढला.

Get real time updates directly on you device, subscribe now.