संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मकरंद (दादा) लेले यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

8

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी पुणे महानगर कार्यवाह मकरंद (दादा) लेले (७७) यांच्या निधनाने संघ परिवारासह पुण्याच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निस्वार्थ समाजसेवा आणि संघकार्याप्रती असलेली अढळ निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मकरंद दादांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दीर्घकाळ सेवा बजावत असताना तसेच स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी संघकार्याला आयुष्य समर्पित केले. पुणे महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अनेक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

त्यांच्या निधनाने संघ परिवारासह सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखित कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.