पुणेकरांना विनाव्यत्यय गॅस पुरवठा मिळण्यासाठी ‘एमएनजीएल’ प्रशासनासोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक!
पुणे : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या मागणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोथरुडसह संपूर्ण पुणे शहरात PNG पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याबाबत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना तात्काळ नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी देण्याची ग्वाही देखील यावेळी देण्यात आली.
या बैठकीस एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.