पुणे जिल्हा परिषद: भाजप आणि दोन्ही शिवसेना गटांच्या नवनियुक्त सदस्यांची संयुक्त बैठक; चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन

7

पुणे : पुणे येथे पुणे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथजी शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सदस्यांशी संवाद साधला.

यावेळी मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच आपले सर्वांचे अंतिम ध्येय आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने व एकजुटीने काम करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी संयुक्त बैठक होती. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एक सामायिक ध्येय ठेवून काम करण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला आमदार राहुल कुल, शरद सोनावणे, बाबाजी काळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.