कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथील आपल्या निवासस्थानी उत्साहात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गेल्या ४ दशकांहून अधिक काळ ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा विचार घेऊन चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाचा मी एक घटक आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनसामान्यांच्या विश्वासामुळे आज भाजपा यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. हाच विश्वास सार्थ ठरवत आपण विकसित भारताच्या संकल्पासाठी कटिबद्ध राहूया, असे पाटील यांनी म्हटले.
यावेळी पाटील यांनी भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा!