कोथरूडच्या विकासाला अधिक गती मिळेल; नवनिर्वाचित नगरसेविका मनिषा बुटाला यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार
पुणे : कोथरूड येथील श्री विद्या उत्तेजक ट्रस्टच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका मनिषाताई बुटाला यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावून मनिषाताईंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मनिषाताई बुटाला यांच्या रूपाने कोथरूडला एक अभ्यासू आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून कोथरूड परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे.”
या सत्कार समारंभाप्रसंगी डॉ. संदीप बुटाला, श्री विद्या उत्तेजक ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि कोथरूडमधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.