उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावली केअर सेंटर’ला दिली सदिच्छा भेट

9

मुंबई : मुंबईतील दादर-नायगाव येथील ‘सावली केअर सेंटर’ ला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पाटील यांनी सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि एकंदरीत व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.

याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना पाटील म्हणाले, ‘सावली’मध्ये रुग्णांची ज्या मायेने आणि तत्परतेने देखभाल केली जाते, ते पाहून समाधान वाटले. कठीण काळात रुग्णांना आधार देण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळातही रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अधिकाधिक दर्जेदार आणि उत्तम आरोग्य सेवा कशा पुरवता येतील, यावर भर देण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असलेल्या सर्व टिमचे चंद्रकांत पाटील यांनी मनापासून कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.