महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त ‘फुले वाड्या’त अभिवादन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली आदरांजली

9

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे (२०० वी जयंती) औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पवित्र ‘फुले वाडा’ येथे जाऊन फुले दाम्पत्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या या महामानवाचा वारसा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

फुले वाड्यात अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणाऱ्या महात्मा फुलेंच्या विचारांना आपण सर्वांनी पुढे नेण्याचा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.