सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा; पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

9

पुणे : पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गांच्या अनुषंगाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षण वर्गात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. २०२६ मध्ये हे अभियान विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.

या प्रसंगी आ. सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मंडल अध्यक्ष सुशांत निगडे, विशाल कोंडे, विधानसभा समन्वयक अजिंक्य वाळेकर, अमित व्होरा तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.