महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : सामाजिक क्रांतीचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पाटील म्हणाले, महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय समाज परिवर्तनाला नवी दिशा देणारे आहेत, असेही पाटील यांनी म्हटले.
या प्रसंगी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती, आ. योगेश टिळेकर, भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विकास लवटे, माजी शहराध्यक्ष नामदेव माळवदे, रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेवक-नगरसेविका, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच कोथरूडमधील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.