‘ऋषी कपूर (चिंटू) आता कॅन्सर फ्री आहेत’

दिग्दर्शक राहुल रावेल

3

जेष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर  गेले काही महिने परदेशात उपचार सुरू होते. परंतु, नेमकं काय झालंय याबाबत मात्र संभ्रम होता. अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता आणि उपचार घेण्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये होते अशी माहिती आता समोर आली आहे. त्यांच्या एका मित्राने सोशल मीडिया पोस्ट च्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांचे मित्र दिग्दर्शक राहुल रावेल यांनी सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘ऋषी कपूर (चिंटू) आता कॅन्सर फ्री आहेत’ असं त्यांनी फोटोखाली लिहिलं आहे.  दिग्दर्शक राहुल रावेल यांच्या पोस्टनंतर ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे