१० मे ला ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला

नंदू माधव प्रमुख भूमिकेत

13

रिमा अमरापूरकर दिग्दर्शित पुरुषोत्तम हा सिनेमा  १० मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता नंदू माधव या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून एका प्रशासकीय अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा ते साकारत आहेत. संवेदना फिल्म फाउंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून औरंगाबादचे माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या जीवनाशी निगडित काही प्रसंग व महानगरपालिकेत त्यांनी घेतलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांवर हा सिनेमा असल्याचे सिनेमाच्या ट्रेलर मधून पाहायला मिळत आहे. नंदू माधव यांच्या समवेत या सिनेमामध्ये अभिनेता किशोर कदम,देविका दफ्तारदार, केतकी अमरापूरक आदि. मान्यवर कलाकार दिसणार आहेत.