अंबाजोगाई येथील शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ येथे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते संपन्न

6

अंबाजोगाई येथील शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आज सकाळी ८ वाजता पोलीस परेड मैदान अंबाजोगाई येथे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटेसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला, या वेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.पृथ्वीराज साठे, स्व.रा.ती.चे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख, पं.स.उप सभापती तानाजी देशमुख, जिल्हा अध्यक्ष तुळशीराम पवार, जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष अभिजीत लोमटे,  ता.अध्यक्ष सुनील आडसुळ, युवक ता.अध्यक्ष धनेश गोरे, ऋषिकेश लोमटे, माजी नगरसेवक नागनाथ आप्पा जोगदंड, दाजी साहेब लोमटे आदी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, पत्रकार व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.