नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवास
अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप
टोकियो (जपान) : वाडिया ग्रुपचे मालक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंमली पदार्थ (ड्रग्) बाळगल्याचा आरोप नेस वाडिया यांच्यावर आहे.
नेस वाडिया यांना 20 मार्च 2019 च्या आधीच जपानमधील होक्काइडो आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर येऊन, ते भारतात परतले होते. वैयक्तिक वापरासाठी ड्रग्ज बाळगल्याची नेस वाडिया यांनी कबुली दिली होती. नेस वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम ड्रग्ज सापडलं.
2020 साली जपानमधील टोकियोत ऑलिम्पिक, तर यंदा म्हणजे 2019 साली रग्बी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अंमली पदार्थांबाबतचे धोरण अत्यंत कठोर करण्यात आले असून, कायद्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात आहे.