मिलिंद एकबोटे यांना मारहाण
समस्त हिंन्दु आघाडी चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे हे काल रात्री सासवड जवळील झेनडेवाडि येथे सप्ताह निमित्त गेले असता त्याना मारहाण करण्यात आली, एकबोटे यानी चार दिवसांपूर्वी पंडित मोडक हा स्वता गोशाळा चालवतो ,आणि गोशाळेत भ्रस्टाचार करतो, असा आरोप मोडक यांच्यावर केला होता.
सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. त्यावेळी पंडित मोडक ,विवेक मोडक , आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने मिलिंद एकबोट आणि त्यांचे इतर कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, परंतु मोडक यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कार्यकर्त्यांनी एकबोटे याना मारहाण केली.
मिलिंद एकबोटे यानी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..