‘फत्ते शिकस्त’ टीमचा दुर्ग-संवर्धन मोहिमेत सहभाग

13

दुर्ग संवर्धन कार्यात अग्रेसर सह्याद्री प्रतिष्ठान ‘ तर्फे दुर्ग-संवर्धन चळवळ कायमच राबवली जाते .गेल्या अनेक दिवसापासून राजगडावरील राजसदरेच्या संवर्धनाच काम ते करीत आहेत. या उपक्रमास त्यांना साथ मिळाली आहे ‘फत्ते शिकस्त’ सिनेमाच्या टीमची, ‘फत्ते शिकस्त ‘ ला सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राजगडावर जाण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने ‘एक दिवस कलाकारांसोबत ‘ या मोहिते अंतर्गत ‘ फत्ते शिकस्त ‘ च्या संपूर्ण टीम ने या दुर्ग-संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी सत्यशील राजे दाभाडे, आणि सह्याद्री प्रतिष्ठान चे श्रमिक चंद्रशेखर धन्वंतरी ,अभिनेता अंकित मोहन, अभिनेता निखिल राऊत आणि सह्याद्री प्रतिष्ठान चे मावळे या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले.

”महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांची खरंच काळजी घेणाऱ्या या समूहासोबत संलग्न असल्याचा अभिमान वाटतो” असे अभिनेता निखिल राऊत यावेळी म्हणाला.