‘जेट एअरवेज’ प्रकरणी मुंडे – पावसकर यांची मुख्यमंत्री भेट
जेट एअरवेज (इं) लि. या विमान कंपनीची उड्डाणे दि. १७ एप्रिल २०१९ पासून बंद झाल्याने २२ हजार कर्माचाऱ्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ह्या कंपनीची मुंबई मध्ये नोंदणी झाली आहे तसेच कंपनी पूर्ववत सुरू व्हावी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा याकारिता काल दि. १० मे २०१९ रोजी ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स ऍण्ड स्टाफ असोसिएशनचे, अध्यक्ष आमदार किरण पावसकर, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, मा. धनंजय मुंडे , कमिटी मेंबर्स आणि कॅबीन क्रु यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेळी मा. मुख्यमंत्री महोदय यांनी लोकसभेची आचारसंहिता २३ मे २०१९ ला संपल्या नंतर कंपनी पुन्हा पुर्ववत सुरु व्हावी याकरिता आपण लक्ष देवून मा. पंतप्रधान व हवाई वाहतूक मंत्रालय यांच्या सोबत चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी पुर्ण प्रयत्न करु, तसेच २२ हजार कर्माचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ असेही यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले.