नाशिक – Whatsapp वरून सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0 3,937
Whatsapp वरून सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. 
अंबड परिसरातील एका रो-हाऊसमध्ये हा प्रकार सुरू होता. Whatsapp च्या आधारे ग्राहक शोधत असल्याने पोलिसा‌ंचा दोन वेळा सापळा अयशस्वी झाला होता.
पोलिस पथकाने जुन्या ग्राहकाच्या संपर्कात असलेल्या एकाकडून दलालाची माहिती मिळवली. त्याने दलालाचा Whatsapp नंबर दिला.त्यावर संपर्क साधला असता सुरुवातीला त्याने प्रतिसाद दिला नाही. मात्र, जुन्या ग्राहकाकडून नंबर मिळाल्याचे सांगितल्यानंतर दलालाचा विश्वास बसला.
 
त्याने संबंधित तरुणींचे फोटो Whatsapp वर पाठवले. दोन दिवस सापळा रचून पथकाने अखेर छापा मारत या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत व्यवसाय चालवणाऱ्या दोन महिलांना अटक केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a comment