मराठा आरक्षण: मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश जारी

15

न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई – न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने आज अध्यादेश जारी केला आहे. 

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाबाबत दिलासा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामधील जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच प्रवेशाची मुदत ही 25 मेऐवजी 31 मे पर्यंत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश कायम ठेवण्यात येतील,” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.