अभिनेत्री दिपाली सय्यदचे ‘एक सुजाण पाऊल..

13

अहमदनगर : अभिनेत्री दिपाली सय्यद हिने अहमदनगर जिल्ह्यातील रांजणी या दत्तक घेतलेल्या गावी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाश्रमदानामध्ये सहभाग घेतला. दिपाली सय्यद अहमदनगर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढे असतात, त्यांच्या श्रमदानातील सहभागामुळे  गावातील अनेक महिला तरुण तरुणींचा मोठा प्रतिसाद  यावेळी पहिला मिळाला. “आपल्या सुरक्षित भवितव्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून घेतलेले एक सुजाण पाऊल.., महाश्रमदान”  असे दिपालीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हंटले आहे.