पुण्यात भाजप चा जोश हाय ! निकाला आधीच अभिनंदनाचे फलक
पुणे लोकसभा मतदार संघात निकाल घोषित होण्याआधीच भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या विजयाचे फलक शिवाजीनगर मतदार संघात लावण्यात आले. आत्तापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप उमेदवार गिरीश बापट पहिल्या फेरी पासून आघाडीवर आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.