कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश

43

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी अप्पी पाटील यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळलेल्या आणि चंदगडच्या भूमीवर कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणाऱ्या अप्पी पाटील यांच्या प्रवेशामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला नवी ऊर्जा आणि बळकटी मिळेल असा विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, तसेच भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.