चित्रपट महामंडळ पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रकाश जावडेकर यांची भेट

8

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले तसेच प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार,संचालिका वर्षा उसगावकर,चैत्राली डोंगरे यांनी मा.श्री.प्रकाश जावडेकर साहेब-कॅबिनेट मंत्री(माहिती व प्रसारण,वन व पर्यावरण,संसदीय कामकाज) यांची दि.६ जून २०१९ रोजी भेट घेतली व मा.सुलोचनादीदी यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा तसेच ऍनिमल वेल्फेयर बोर्ड चे कार्यालय मुंबई येथे सुरु करावे तसेच मराठी चित्रपटांच्या तिकिटावरील GST रद्द करावा तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने तीन वर्षांपूर्वी SFC अंतर्गत निर्मात्यांना मालिकांची निर्मिती करावयाचे आव्हाहन केले होते. त्यापैकी ३० निर्मात्यांच्या मालिका Approval केल्या होत्या परंतु त्यांना अजूनही प्रसारण तारीख मिळाली नाही तरी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासंबंधीचे निवेदन दिले व चर्चा केली तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले.

Tree Plantation by Shri Prakash Javadekar