शेखर मुंदडा यांना सामाजिक कार्यासाठी विशेष पुरस्कार !

11

पुणे : महा एन जी ओ फेडरेशचे संस्थापक मा.श्री.शेखर मुंदडा यांना Aspire समूहा तर्फे सामाजिक कार्यासाठी विशेष “ASPIRE NGO Award” देऊन सन्मानित करण्यात आले. बालगंधर्व पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “चाणक्य” या लोकप्रिय नाटकाचे विशेष प्रयोग सादर करण्यात आला.

पदमश्री अभिनेते मा. मनोज जोशी, केंद्रीय अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष मा.श्री दादा इदाते, डॉ एस पी कोक्चर, खादी ग्राम उद्योग प्रमुख श्री यशोवर्धन बारामतीकर, मा.संजय गांधी, मा श्री यशवंत माणखेडकर, श्री मनीष भानवे, डॉ दयानंद सोनसाळे व पुणे परिसरातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.