“भाई कि जुबान” रोहित शेट्टी ने ठेवला मान, बदलली तारीख

1

सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बा नंतर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या येणाऱ्या आगामी ‘सूर्यवंशी’ या सिनेमाची तारीख रोहित शेट्टीने बदलेली आहे. २०२० ला ईद च्या दिवशी प्रदर्शित होणार सूर्यवंशी आता २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. 


बॉलिवूडचा भाईजान सुपर स्टार सलमान खान चा सिनेमा २०२० मध्ये ईद च्या दिवशी रिलीज होत असल्याने रोहित शेट्टीने हा निर्णय घेतल्याचे कळतं. दोन्ही मोठ्या बॅनरचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी समंजसपणा दाखवत सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. सलमानने एका फेसबुक पोस्ट द्वारे रोहित शेट्टीचे कौतुक केले आहे.