शेवटी पंजा मारलाच.!! – जयंत पाटील 

12

सत्ता संघर्ष पेटला असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काही तासापूर्वी राज्याचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटर द्वारे  हे व्यंगचित्र पाठवून, जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर त्यावर How’s the Josh ? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. वाघाने पंजा मारतानाचे हे चित्र, असले तरी वाघाला  तो पंजा मारण्याचे बळ काँग्रेसचे आहे असे हि तर्क लावण्यात येत आहे.  


शिवसेनेकडून दररोज होणारी मुस्कटदाबी आणि शरद पवार यांची गुलदस्त्यातील भूमिका पाहता भारतीय जनता पार्टी आता नक्की कोणती पावले उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.