कोरोना अपडेट : पुण्यात शहरातील सर्वाधिक रुग्ण असलेले ‘पाच’ भाग
पुण्यातील लॉक डाऊन अधिक कडक केला असला तरीही दररोज शहरातील पोझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुणे स्मार्ट सिटीने दिलेल्या माहिती नुसार दि. 22 एप्रिल २०२० पर्यंतची पुण्यातील पोझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ७८३ आहे. हि माहिती वॉर्ड पद्धतीने देण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुण्यात सर्वाधिक रुग्ण असलेले पाच भाग आणि त्यातील रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
१. भवानी पेठ – १७१
२. कसबा- विश्रामबागवाडा – १११
३. ढोले-पाटील – ११०
४. येरवडा – धानोरी – ८२
५. शिवाजीनगर – घोलेरोड – ७७