पुणे: मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष ‘शांताराम कुंजीर’ यांचे निधन

59

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा सेवा संघाचे मुख्य समन्वयक, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांचे काल पहाटे पुण्यामध्ये निधन झाले, ते ५५ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी निगडी प्राधिकरण येथील लोकमान्य हाॅस्पीटल मध्ये ” Cervical Spine” चे ऑपरेशन झाले होते. काल रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, त्यावेळी उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू, भाऊ असा परिवार आहे.

शांताराम कुंजीर ३० वर्षांपासून, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कार्यरत होते.