लहान मोठा व्यवसाय – उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘फर्स्ट महा मार्ट.कॉम’ सज्ज
पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते औद्योगिक नगरीत शुभारंभ.
पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते फर्स्ट महामार्ट . कॉम www.firstmahamart.com या ग्लोबल मार्केटिंग आणि बिजनेस लिस्टिंग प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातून सुरु झालेल्या या ग्लोबल व्यासपीठावर लहान मोठे सर्व उद्योजक,सेवापुरवठादार आपले मार्केटिंग करुन आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचू शकणार आहेत.
“प्लॅटफॉर्ममुळे उद्योजक, व्यावसायिक आणि युवकांना निश्चितच अल्पदरात बिजनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल असा विश्वास उपमहापौर तुषार हिंगे यांनी व्यक्त करीत फर्स्ट महामार्टची निर्मिती करणाऱ्या युवा उद्योजक व फर्स्टमहा ट्रेडमार्ट प्रा. लि चे संचालक केतन महामुनी यांना शुभेच्छा दिल्या .”
फर्स्ट महा मार्ट मध्ये व्यवसाय, उद्योगाची नोंदणी सुरु असून सुरवातीचे तीन महिना उद्योजकांना त्याचा मोफत लाभ घेता येणार आहे. यानंतर अल्प दरात हि सेवा देण्यात येणार आहे. फर्स्ट महा मार्ट. कॉम मध्ये ग्राहक लोकेशननुसार सर्च करू शकत असल्याने आपल्या परिसरातील ग्राहक मिळण्यात व्यावसायिकांनाही मदत होणार आहे.
” लॉक डाउन मध्ये अनेक नवनवीन प्रयोग व्यावसायिकांनी केले, ग्राहकांपर्यंत पोहोचायचे कसे, ग्राहकही खात्री लायक विक्रेते मिळणार कुठे या शोधात असल्याचे जाणवले. आज काही नामांकित बिजनेस लिस्टिंग कंपन्यांचे वार्षिक मोठे मोठे पॅकेजेस आहेत, काही कमीशन घेतात ज्यामुळे सर्वच व्यवसायिकांना त्यांची सेवा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील उत्पादक, व्यावसायिक, सेवा क्षेत्रातील इतर उद्योजक आणि ग्राहक यांना थेट जोडणारे हे अनोखे हक्काचे व्यासपीठ अल्प शुल्का मध्ये उपलब्ध करुन देण्याची कल्पना मनात आली आणि फर्स्ट महा मार्ट सुरु करण्याचे ठरविले असे सांगत, महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण भागातील लहान व्यवसायिकांपासून सर्व उद्योजक, यांना निश्चितच याचा फायदा होईल असा विश्वास फर्स्टमहा मार्ट संस्थापक व FTPL चे संचालक केतन महामुनी यांनी व्यक्त केला.”
www.firstmahamart.com
मध्ये
ग्राहकांसाठी उत्पादक, व्यावसायिक, उद्योजक यांची
संपूर्ण माहिती, संपर्क जिओ लोकेशन सह उपलब्ध असणार आहे. उत्पादक, उद्योजक, सेवाक्षेत्रातील
व्यावसायिक यांना स्वतंत्र प्रोफाइल पेज,
प्रोडक्ट गैलरी, प्रोफाइल, केटलॉग
डाउनलोड, लाइव चॅट, अपॉइंटमेंट बुकिंग सह अनेक आधुनिक फिचर
यामध्ये देण्यात आले आहेत. उत्पादक,
उद्योजक,
व्यावसायिक, सेवा
पुरवठादार आणि ग्राहक यांना एकत्र घेऊन येणारा हा एकमेव प्लेटफार्म असून
थेट संपर्क होत असल्याने ग्राहकांना आणि व्यवसायीकांना याची निश्चितच मदत
होणार आहे.
फर्स्ट महा मार्ट सध्या वेब
पोर्टल स्वरूपात तसेच लवकरच मोबाईल अँड्रोइड ऍप्लिकेशन स्वरूपात सर्वांना उपलब्ध
असणार आहे. व्यापाराला गती,
उद्योगाची प्रगती टॅग लाइन असलेले
फर्स्टमहा मार्ट येणाऱ्या काळात उद्योजकांना,
व्यवसायिकांना उपयुक्त ठरेल यात शंका
नाही.