भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही – भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे यांचा इशारा

24

पिंपरी :  भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजपचा प्रचार न केल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा थेट कडक इशारा भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला आहे. त्यांनी या बाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून मेरिटनुसार जागा वाटप केले आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे अनुक्रमे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजप उमेदवारांचे काम करणार नसल्याचे, असे सांगत आहेत. त्यांनी तसे केल्यास आम्ही ही पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशारा तुषार हिंगे यांनी दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.