अजितदादा, तुम्ही चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा, रुपाली चाकणकरांची खोचक टीका

14

पुणे: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. त्यांच्यावर अजितदादांनी करमणूक कर लावावा, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत केली आहे.

तसेच ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांची खिल्ली उडवली. चंद्रकांतदादांची खिल्ली उडवणारं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. तसंच अजितदादांना विनंती करत चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्राच्या जीएसटी परताव्यावरही बोट ठेवलं आहे.

चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.”

नेमक हे प्रकरण काय आहे जाणून घ्या?

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलंय. किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय.

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.