ठाकरे सरकारमध्ये मतभेद, बहुसदस्यीय प्रभाग रचनेला काँग्रेसचा विरोध

33

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील  मतभेद पुन्हा एकदा समोर आला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे मंत्री सुद्धा होते. आता काँग्रेस पक्षाने या बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे.

ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?

महापालिकेच्या या निवडणुका मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. या निवडणुकांमध्ये कसा कल मिळतो यावरुन महाराष्ट्रातील राजकारण ठरणार आहे. मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग असणार आहे. म्हणजे एका प्रभागातून तीन सदस्य निवडून येणार आहे. तोच निर्णय नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्यासाठी 2 सदस्यीय प्रभाग असणार आहे. तर नगर पंचायतीसाठी 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणजे काय?

1 सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदार एकाच उमेदवाराला मत देता येणार आहे. पण मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकतात. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करु शकतात. तर नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल. हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. मुळात भाजपने सुरुवातील 2017 साली अशाप्रकारची प्रभाग पद्धती आणली होती. पण त्यावेळी प्रत्येक महापालिकेत वेगवेगळ्या स्वरुपाची रचना होती. पण याबाबत महाविकास आघाडीने आता सुसुत्रता आणणं गरजेचं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापुढे मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर उर्वरित महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभा रचना असणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरसह काही महापालिकेत दोन सदस्यीय प्रभाग पद्धत राहावी अशीच काही नेत्यांची मागणी होती. त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत यासंबंधीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.