शिवसेना खासदार भावना गवळी यांना ED ची नोटीस; 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

वाशिम: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता अंमलबजावणी संचलनालयाने (ED) त्यांना समन्स बजावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कालच (28 सप्टेंबर) भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!