शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचे तिसरे समन्स

6

मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स बजावले आहे. या समन्समध्ये त्यांना २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्यांनी तीन वेळा समन्सला प्रतिसाद दिलेला नाही.

भावना गवळी यांच्याशी संबंधित संस्थांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी तपास करत आहे. ईडीने याप्रकरणी भावना गवळी यांचा निकटवर्तीय कंत्राटदार सईद खान याला अटक केल्यानंतर भावना गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते.

यावेळी त्यांनी १५ दिवसांची वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीने भावना गवळी यांना दुसरे समन्स बजावून २० ऑक्टोबर रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हा चिकनगुनियाची लागण झाल्याचे कारण देत त्या गैरहजर राहिल्या. त्यापाठोपाठ आता शनिवारी त्यांना समन्स बजावून २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.