सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई: आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती उतरताना दिसत आहे. मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील किरकोळ प्रमाणात घट होताना दिसत आहे. आजच्या घसरणीनंतर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,030 रुपये आहे. तर, चांदीची 60,450 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गेल्या दोन दिवसात प्रती तोळा सोन्याच्या दरात तब्बल 250 रुपयांची घट झाली आहे. 250 रुपयांच्या घटीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 30 रुपये प्रती तोळा आहे. सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज वाढ झाली आहे. आज चांदी प्रति किलो मागे तब्बल 350 रुपयांची वाढ झाली आहे. 350 रुपयांच्या वाढीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात चांदीचा दर 60 हजार 450 रुपये प्रती किलो आहे.
दरम्यान सणासुदीला सोन्याचे दर उतरल्याने खरेदीदारांना आनंदाचं वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे भाव घसरले आहेत. जूनमध्ये भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार 740 होती. तर जुलै महिन्यात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 46,190 रुपये मोजावे लागत होते. ऑगस्टमध्ये ते 45,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सप्टेंबर महिन्या अखेर 22 कॅरेट सोन्यासाठी 45,030 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसू शकते.
कोरोनामुळे गेल्या वर्षी 24 कॅरेट सोन्याचे दर 56 हजार रुपयांहून अधिक पोहोचले होते. त्यानंतर आता वर्षभराने ही जवळपास 10 हजारहून अधिक रुपये सोन्याचे भाव खाली उतरले आहेत. दुसरीकडे आता शेअर आणि स्टॉक मार्केट प्रमाणे 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढलं आहे. दरम्यान वर्षा अखेरीस पुन्हा एकदा सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात आताच गुंतवणूक करावा असा काही तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. सोन्याचे दर आता अजून खाली येणार का याकडे गृहिणी आणि गुंतवणूकदारांचं लक्ष आहे.