सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर

7

मुंबई: पेट्रोल आणि डिझेल मध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढिमुळं सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. तर डिझेलच्या किमतीमध्ये 35 रुपये प्रति लिटरनं वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाहीये. या महिन्यात सोमवारी, 4 ऑक्टोबर वगळता दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.  अशातच केवळ ऑक्टबर महिन्याच्या 10 दिवसांतच पेट्रोलची किंमत 2.80 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत 3.30 रुपयांनी वाढली आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दरवाढिनंतर दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर 93.18 रुपयांवर पोहोचली आहे.

या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल 25 पैशांनी महाग झालं होतं, तर डिझेलही 30 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती. अशातच डिझेलच्या किमतीतही सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली. 10 दिवसांत डिझेल 3.30 रुपयांनी महाग झालं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.