…त्यांच्या काय भरोसा ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावरही बोलू शकतात, देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर

3

नागपूर: केंद्रसरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना परदेशात जाण्यासाठी मदत केली नाही ना? अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.  त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले काहीही बोलत असतात. नाना तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यावरही बोलू शकतात, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. नाना पटोले काहीही बोलतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात, असा खोचक फडणवीसांनी लगावला.

काय म्हणाले होते पटोले?

दरम्यान, मुंबईत गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर आरोप केला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, परमवीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.