धक्कादायक: अहमदनगरमध्ये एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

11

अहमदनगर: तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच कुंटूबातील सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्हात घडली आहे. यामध्ये पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे.

राहुरीतील अमर चंद्रकांत पगारे (वय 15), सुमित चंद्रकांत पगारे (वय 12) हे दोघे, श्रीरामपुरातील मंजाबापू भागवत गायकवाड (वय 45), चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय 40) हे वाहून गेले असून, कोपरगावातील संजय मारुती मोरे (वय 35) व मुलगा सचिन संजय मोरे (वय 15) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून पती-पत्नीला प्राण गमवावे लागले.

Get real time updates directly on you device, subscribe now.