धक्कादायक: अहमदनगरमध्ये एसटीलाच गळफास घेत चालकाने संपवले जीवन

25

अहमदनगर: शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली. भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली.

रात्री काकडे शेवटची बस घेऊन डेपोत आले आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झाले. मध्यरात्री संप मिटल्याची घोषणाही झाली, मात्र, सकाळी काकडे यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या आत्महत्येमुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोनलाची धग पुन्हा पेटणार असल्याची शक्यता आहे. शेवगावमधील एसटी कर्मचाऱ्यांनी या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. यात कोल्हापूरातील अनेक एसटी कर्मचारी सहभागी झाले आहे. तर धुळ्यातील पाच एसटी आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास विरोध दर्शवला आहे. यामुळे एसटी महामंडळाला ३० लाख ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.