धक्कादायक! इगतपुरी-कसारादरम्यान धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार

15

कल्याण: राज्यात महिलांवरील अत्याचारांचा प्रश्न ज्वलंत बनलेला असतानाच आणखी एक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे.  अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार  केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी रेल्वेतील 15 ते 20 प्रवाशांना लुटल्यानंतर त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. संबंधित धक्कादायक घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये  घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना लुटले. 15 ते 20 प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

15 ते 20 प्रवाशांना दरोडेखोरांनी लुटलं. दरोडेखोरांनी प्रवाशांचे पैसे आणि इतर किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक लुटमार सुरू झाल्यानं बोगीत भितीचं वातावरण निर्माण झालं. प्रवाशांना लुटत असतानाच दरोडेखोरांची नजर प्रवास करत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर गेली. दरोडेखोरांनी तिला आपल्या वासनेची शिकार केलं. धावत्या ट्रेनमध्ये त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. या कृत्यानंतर दरोडेखोरांनी गाडीतून पोबारा केला. हा सर्व प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे.

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणात दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच लोहमार्ग पोलिसांनी चार आरोपींनी अटक करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात असून, इतर चार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.