पाकिस्तानातही कंगनाचा चित्रपट टॉप ट्रेंडवर, कंगना रणौत म्हणाली….

मुंबई: बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना रणौत. कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो अथवा राज्यातील राजकारण. एखाद्या विषयावर मत मांडण्याची संधी कंगना कधीही सोडत नाही.

कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्येही हा चित्रपट ट्रेंड असल्याचे बोललं जात आहे.

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये वाईट अर्थाने ट्रेंड केला जात आहे. या चित्रपटाचा पाकिस्तानमधील अनेकांनी निषेध केला आहे. हा चित्रपट वाईट असल्याचे अनेक पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे. काल रविवारपासून पाकिस्तानात ट्वीटरवर ‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानातील नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांची यादी शेअर केली. यात ‘थलायवी’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे.