केरळमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

3

मुंबई: केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या काही तासांपासून केरळमध्ये अतिमुसळधार पावसामुळे केरळ राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून आतापर्यंत ९ जणांना मृत्यू झाला आहे. केरळमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे तर अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये सध्या NDRFच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एअरफोर्सच्या हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने पूरात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू करण्यात येत आहेत. केरळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून  पठानमथिट्टा,कोट्टयम,एर्नाकुलम,इडुक्की,त्रिशूर आणि पलक्कड या सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इडुक्की जिल्ह्यातील थोडुपुझा येथे अतिमुसळाधार पावसामुळे एका माणसाचा मृत्यू झालाय. तर ग्रामीण कोट्टायममध्ये भूस्खलन झाल्याने १२ लोक बेपत्ता झाले आहेत. पोलीस आणि अग्निशम दल त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. इडुक्की जिल्ह्यातील कोट्टायम आणि कोक्यार भागात भूस्खलनात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळचे मंत्री राजन यांनी केरळमध्ये निर्माण झालेल्य पूरपस्थितीतीचा आढावा घेतला असून भारतीय वायू सेना मदत करण्यास तयार असून पूरात अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल.

केरळमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे केरळमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. पतनमतिट्टा येथे लोकांच्या घराघरात पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्यात लोकांचे संसार वाहून गेले आहेत. दोरीच्या सहाय्याने घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहेत. संपूर्ण रस्ते,दुकाने, घरे तसेच वाहने पाण्याखाली गेली आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.