पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीचा विश्वासघात; लॉजवर बोलावून बलात्कार

पुणे: पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला एका नागपुरातील एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर दोन दिवस अत्याचार केल्यानंतर, पुण्याला निघून आला आहे. यावेळी आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडित मुलीशी लग्न देखील उरकून घेतलं होतं.

याप्रकरणी पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गौरव जगनानी असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर 28 वर्षीय पीडित तरुणी नागपुरातील उच्चभ्रू कुंटुबातील असून ती खाजगी कंपनीत नोकरी करते.

आरोपी गौरव आणि पीडित तरुणीची मेट्रिमोनियल साइटवरून ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी देखील केली होती. जवळपास लग्न पक्क ठरलं होतं. दरम्यान आरोपी गौरवने लग्नासाठी किती खर्च करणार अशी विचारणा केली.  कुटुंबीयांनी 15 ते 20 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली. पण गौरवच्या कुटुंबीयांनी किमान 40 लाख रुपये खर्च करण्याची अट घातली यावरून हे लग्न मोडलं.

दरम्यान आरोपी गौरवने तरुणीशी संपर्क साधून ‘मला तुझ्याशीच लग्न करायचंय’ असं सांगितलं. त्यासाठी तो नागपुरात देखील आला. याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं पीडितेला सीताबर्डी येथील हॉटेल आदित्यमध्ये बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून दोन दिवस शारीरिक संबंध ठेवले.  यानंतर आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडितेशी लग्न केलं. तसेच आपण लवकरच परत येतो, असं सांगून आरोपी पुण्याला निघून गेला.