लहु बालवडकर सोशल वेलफेअर करत असलेले काम स्तुत्य आणि प्रशंसनीय – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

पुणे: लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने बालेवाडी भागात सुरु करण्यात आलेल्या “फर्स्ट एड पॉलिक्लिनिक” ला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय डॉ. भारतीताई पवार यांनी आज सदिच्छा भेटी दिली. यावेळी नागरिकांना अल्प दरात आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने चालू केलेल्या या आरोग्य केंद्राबद्दल  डॉ. भारतीताई पवार यांनी सोशल फेअर चे संस्थापक लहु बालवडकर यांच्या कडून सविस्तर माहिती घेतली व या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे अध्यक्ष लहु बालवडकर , नगरसेविका ज्योतीताई कळमकर, गणेशदादा कळमकर, प्रभाग क्र. 9 च्या भाजपा महिला आघाडी च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, उपाध्यक्षा नैनाताई पोळ, आय.टी सेल च्या अध्यक्षा उज्वलाताई साबळे, रिना सोमय्या, राखी श्रीवास्त शिवानी अग्रवाल, सिमरन पुला, शिवम सुतार, सचिन दळवी, शिवम बालवडकर व इतर पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते.

या पॉलिक्लिनिक बद्दल बोलताना डॉ. भारतीताई पुढे म्हणाल्या की, लहु बालवडकर करत असलेले काम नक्कीच स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे व यामुळे आमच्या विभागाला नक्कीच मदत होत आहे. तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भविष्यकाळात देखील असेच आरोग्याविषयक उपक्रम आपल्या लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या माध्यमातून राबविले जावेत जेणेकरून कोणीही या आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!