कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा दृढ संकल्प करून, तोंडामध्ये साखर ठेवून, पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क करावा, चंद्रकांत पाटील यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरुड मतदारसंघातील दक्षिण कोथरुड प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मधील पदाधिकाऱ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.
दरम्यान, मोदीजींचे ‘अब की बार, ४०० पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे पाटील म्हणाले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा दृढ संकल्प करून, तोंडामध्ये साखर ठेवून, पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी सरचिटणीस पुनीत जोशी, राजेश येनपुरे, दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, ॲड. वर्षाताई डहाळे, कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, आशुतोष वैशंपायन, कैलास मोहोळ, सागर कडू, अंबादास अष्टेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.