रणजीत सिंग हत्याकांड: आरोपी राम रहीमला जन्मठेप! सीबीआय न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

11

मुंबई: हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम या आरोपीला रणजीत सिंग हत्याकांडात सीबीआईच्या विशेष कोर्टाने  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली आणि आरोपी राम रहीम यांच्यासोबत इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  २००२ साली डेरा प्रमुख रणजीत सिंह यांची राम रहीम यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

या प्रकरणात राम रहीम यांना अटक करुन हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. तब्बल १९ वर्षांनी पंचकुलाच्या सीबीआय कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. याआधी ८ ऑक्टोबर रोजी राम रहीम याच्यासह चार जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. राम रहीम,कृष्ण लाल,सबगिल,अवतार आणि जसबीर या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यातील एक आरोपी इंद्रसेन याचा मृत्यू झाला आहे.

डेरा मॅनेजर रणजीत सिंह हत्याकांडासोबत राम रहीम यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्या सर्व आरोपांसाठी त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. २०१७मध्ये मठातील सांध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा राम रहीम यांना सुनावण्यात आली होती. सांध्वी बलात्कार प्रकरण त्याचप्रमाणे पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणातही राम रहीम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात राम रहीम यांच्यासह चार जणांना दोषी ठरण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती. राम रहीम यांनी २००२मध्ये रणजीत सिंह यांची हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय अंतर्गत सुरू होता. सीबीआयच्या विशेष कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. ३ डिसेंबर २००३मध्ये सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल करुन घेतली होती. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडातही राम रहीम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये राम रहीम शिक्षा भोगत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.