वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू

मुंबई: नववर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचलचे होते. त्यादरम्यान, चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
सर्व जखमींवर या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे
माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार तर १३ जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे २:४५ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दुःख केले आहे. “माता वैष्णो देवी भवनात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. देव जखमींना लवकर बरे करो. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत आणि मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.