200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, अखेर जॅकलिन फर्नांडिस ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी चौथ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने जॅकलीनला सुकेश चंदाशेखर 200 कोटींच्या जामीन प्रकरणात समन्स बजावले होते. ईडीने जॅकलिनला तिचं बँक स्टेटमेंट आणि तीन वर्षांचे डेबिट/क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सोबत आणण्यास सांगितलं होतं. यापूर्वी ईडीची टीम  4 वेळा जॅकलिनची चौकशी करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जॅकलीन ईडीच्या चौकशीत सामील होऊ शकली नाही.

जॅकलीन फर्नांडिस 25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी ईडीसमोर उपस्थित राहू शकली नाही. याआधी, ईडीने 30 ऑगस्ट रोजी या प्रकरणात जॅकलिनचे बयान नोंदवलं होतं. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  जॅकलीन फर्नांडिसचं बयान नोंदवलं जात आहे. जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला की नाही याची तपासणी एजन्सी करत आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण 200 कोटींच्या खंडणीचे आहे, त्यातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून एवढी मोठी रक्कम वसूल केली होती. यामुळे तो तुरुंगात आहे. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही सापडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणास्तव लीना पॉलचीही तासन्तास चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सांगण्यात आले की, पॉलने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदितीची फसवणूक करण्यासाठी सुकेशला कथितपणे मदत केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सुकेश आणि त्याच्या पत्नीशिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Also :