शाहरुख खानला मोठा धक्का! आर्यन खानचा जामीन फेटाळला

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचासह सर्व आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना अशी आशा वाटत होती की, किमान आज तरी कोर्ट आर्यनला जामीन मंजूर करेल. पण तसं घडलेलं नाही. त्यामुळे आता खान कुटुंबीय पुढे नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय सुनावताना फक्त जामीन अर्ज नाकारल्याचं सांगितलं. कोर्टाकडून संपूर्ण ऑर्डर जारी होताच आर्यन आणि इतर आरोपींचे वकील हे जामीन अर्जासाठी मुंबई हायकोर्टात जातील. 14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यानंतर आज (20 ऑक्टोबर) कोर्टाने निर्णय देताना आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.